गयाना - विंडीजविरुध्दच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात भारताने ७ गडी राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिजच्या संघाने दिलेले १४७ धावांचे आव्हान भारताने १९.१ षटकांतच ३ गड्याचा मोबदल्यात पूर्ण केले. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकली. त्यानंतर विराटने संघात घेतलेल्या फिरकीपटू राहुल चहरला मैदानात प्रवेश करण्यापूर्वीच विक्रम करण्याची संधी मिळाली.
मंगळवारी झालेल्या टी-२० सामन्यात भारताकडून फिरकीरपटू राहुल चहरने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यामुळे राहुलने कमी वयात पदार्पण करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत चहरने चौथे स्थान काबीज केले आहे. याआधी, चौथ्या स्थानावर स्फोटक फलंदाज सुरेश रैना विराजमान होता. मात्र २० वर्ष आणि २ दिवस वय असलेल्या राहुलने रैनाला मागे टाकले आहे.