हैदराबाद -इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) इतिहासातील सर्वात वयस्कर खेळाडू प्रवीण तांबे पुन्हा एकदा आयपीएलमध्ये दिसणार आहे. मात्र, यंदाच्या हंगामात तो खेळाडू म्हणून उपलब्ध नसेल. कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघामध्ये तो प्रशिक्षक कर्मचाऱ्यांपैकी (कोचिंग स्टाफ) एक असेल. वयाच्या ४१व्या वर्षी तांबेने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.
संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी म्हैसूर यांनी ही माहिती दिली. म्हैसूर म्हणाले, ''यूएई खेळपट्ट्या फिरकीपटूंना उपयुक्त ठरतील आणि यामुळे संघ व्यवस्थापनाच्या मागणीमुळे प्रवीण तांबेला कोचिंग स्टाफमध्ये स्थान देण्यात आले आहे. तांबे फिरकीपटूंना उपयुक्त ठरणाऱ्या खेळपट्टीवर फलंदाजांना तयार करण्यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडेल. सीपीएलमध्ये न खेळलेल्या सामन्यातही त्याने मैदानाच्या बाहेरून सक्रिय भूमिका बजावली, ड्रिंक्सब्रेकमध्येही तो मैदानावर जात होता आणि सीमारेषेबाहेरूनही खेळाडूंनाही उत्तेजन देत होता.''