महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

चेन्नईने माझ्यासाठी 6.75 कोटी का मोजले?...पीयुष चावलाने सांगितले कारण - csk bought chawla reason news

2012 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या चावलाला 2020 च्या आयपीएल लिलावात बोलीची अपेक्षा नव्हती. मात्र, लीगमधील यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला संघात सामील करून घेतले. या बोलीपाठी असणारे कारण चावलाने स्पष्ट केले आहे.

spinner piyush chawla reveals why csk bought him for ipl 2020
चेन्नईने माझ्यासाठी 6.75 कोटी का मोजले?...पीयुष चावलाने सांगितले कारण

By

Published : Jul 14, 2020, 7:14 PM IST

नवी दिल्ली - भारताचा अनुभवी लेगस्पिनर पीयुष चावला आणि महेंद्रसिंह धोनी यांचा विशेष संबंध आहे. सर्वांना चकित करत त्याने 2011च्या वर्ल्डकप संघात स्थान मिळवले होते. तर, याशिवाय 2007 च्या वर्ल्ड टी-20 संघातही तो संघाचा भाग होता.

2012 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या चावलाला 2020 च्या आयपीएल लिलावात बोलीची अपेक्षा नव्हती. मात्र, लीगमधील यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला संघात सामील करून घेतले. या बोलीसाठी असणारे कारण चावलाने स्पष्ट केले आहे.

हरभजन सिंग, इम्रान ताहिर, मिशेल सॅटनर आणि रवींद्र जडेजा असूनही सीएसकेने आणखी एक फिरकी गोलंदाज निवडला. धोनीने त्याला संघात घेण्याची योजना आखली होती, असे चावलाने सांगितले आहे. तो म्हणाला, "आयपीएल सुरू होण्यापूर्वी मी चेन्नई सुपर किंग्जच्या कॅम्पमध्ये सहभागी झालो होतो. मी धोनीशी क्रिकेटबद्दल बोललो. मग मी त्याला माझ्या निवडीबद्दल विचारले. तेव्हा तो म्हणाला, की हा माझा निर्णय होता.''

चावला हा या लिलावातील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला. अनेक संघांनी त्यांच्यावर बोली लावली. मात्र, सीएसकेने 6.75 कोटींची बोली लावत चावलाला आपल्या संघात दाखल करून घेतले. 2012 आणि 2014 या आयपीएलच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सला विजेता बनवण्यात चावलाची महत्त्वपूर्ण भूमिका होती.

आयपीएलमध्ये त्याने 157 सामन्यांमध्ये 150 बळी घेतले असून तो या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत हरभजन सिंगसह संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details