कोलकाता- बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी धडाकेबाज कामगिरी करत बांगलादेशी फलंदाजांची दाणादाण उडवली. अवघ्या १०६ धावांमध्ये बांगलादेशचा संघ तंबूत परतला. भारतीय गोलंदाजांसोबत भारताने क्षेत्ररक्षणातही आपल्या लौकिकाला साजेशी अशी कामगिरी करुन दाखवली आहे.
'हिटमॅन'चा अफलातून झेल..तुम्हीही म्हणाल 'व्हॉट अ कॅच' - भारत-बांगलादेश पिंक बॉल कसोटी
अवघ्या १०६ धावांमध्ये बांगलादेशचा संघ तंबूत परतला. भारतीय गोलंदाजांसोबत भारताने क्षेत्ररक्षणातही आपल्या लौकिकाला साजेशी अशी कामगिरी करुन दाखवली आहे.
'हिटमॅन'चा अफलातून झेल
हेही वाचा - 'तो' सुपरझेल घेत वृद्धीमान साहा ठरला 'बळीसम्राट'.. माहीच्या विक्रमाशी केली बरोबरी
भारतीय संघाचा हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने भल्या भल्या फलंदाजांना तोंडात बोट घालावे लागेल अशी कामगिरी करुन दाखवली आहे. बांगलादेशचा कर्णधार मोमिन उल हक याचा अफलातून झेल पकडत त्याला माघारी धाडले. रोहितने घेतलेल्या या अफलातून झेलाने सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का दिला. रोहितच्या या 'व्हॉट अ कॅच' चा व्हिडिओ व्हायरल होत आहे.