जोहान्सबर्ग -कोरोनाच्या साथीमुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडिज दौरा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाचा (सीएसए) संचालक ग्रॅमी स्मिथने ही माहिती दिली. आफ्रिका संघ विंडीज दौऱ्यावर 23 जुलै ते 16 ऑगस्ट दरम्यान दोन कसोटी आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार होता. यापूर्वी जूनमधील दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंका दौरादेखील पुढे ढकलण्यात आला होता.
दक्षिण आफ्रिकेचा विंडीज दौरा स्थगित - sa vs wi 2020 news
सप्टेंबरमध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) बाबतही स्मिथने चिंता व्यक्त केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्मिथने पत्रकारांना सांगितले, "वेस्ट इंडीजचा दौरा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आला आहे. आता आम्ही आयपीएलमध्ये फिट होण्यासाठी आणि वेळ मिळवण्यासाठी धडपडत आहोत.''
सप्टेंबरमध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) बाबतही स्मिथने चिंता व्यक्त केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्मिथने पत्रकारांना सांगितले, "वेस्ट इंडीजचा दौरा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आला आहे. आता आम्ही आयपीएलमध्ये फिट होण्यासाठी आणि वेळ मिळवण्यासाठी धडपडत आहोत. आमच्या खेळाडूंनी सप्टेंबरमध्ये जाणे अपेक्षित आहे. सुरुवातीपासूनच सरकारची परवानगी आणि प्रवासाची परवानगी आवश्यक आहे.''
सीएसए कोरोना व्हायरसमुळे निलंबित मालिका पुन्हा वेळापत्रकात आणण्याचा प्रयत्न करेल, असेही स्मिथने संकेत दिले आहेत. जगभरात 1 कोटी 77 लाख 66 हजार 840 जणांना कोरोनोचा संसर्ग झाला आहे. तर 6 लाख 83 हजार 218 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 1 कोटी 11 लाख 66 हजार 333 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.