लखनऊ -७ मार्चपासून रंगणाऱ्या मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाची तयारी जोरात सुरू आहे. या मालिकेचे सामने अटलबिहारी बाजपेयी एकना स्टेडियमवर होतील. ५ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने असे या मालिकेचे स्वरूप आहे.
भारतीय संघाच्या २१ महिला सदस्य लखनऊमध्ये दाखल
या मालिकेसाठी लखनऊला आलेल्या २१ भारतीय क्रिकेटपटूंना हॉटेलमध्ये अलग ठेवण्यात आले आहे, तर उर्वरित चार सदस्य शनिवारी, २७ फेब्रुवारीला लखनऊला येणार आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेतील महिला क्रिकेटपटू आज लखनऊला येणार आहेत. या २५ सदस्यांच्या संघात क्रिकेटपटू, प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि इतर कर्मचारी असतील.
दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आज शनिवारी दुपारपर्यंत लखनऊला पोहोचणार आहे. सर्वजण पिका कॅडली हॉटेल येथे उतरतील. या दौर्याचा शेवटचा टी-२० सामना २४ मार्च रोजी होईल. यूपी क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी युधवीर सिंग यांच्या म्हणण्यानुसार सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ २५ फेब्रुवारीला लखनऊला येणार होता, पण वेळापत्रकात बदल झाल्यामुळे हा संघ २७ फेब्रुवारीला लखनऊमध्ये येणार आहे. ही मालिका बायो सिक्योर बबलमध्ये असेल. या मालिकेद्वारे १२ महिन्यांनंतर भारतीय महिला क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय सामना खेळतील. महिला क्रिकेट संघाने मागील वर्षी मार्च महिन्यात टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान शेवटचा सामना खेळला होता.
एकदिवसीय सामने
- ७ मार्च - पहिला सामना
- ९ मार्च - दुसरा सामना
- १२ मार्च - तिसरा सामना
- १४ मार्च - चौथा सामना
- १७ मार्च - पाचवा सामना
टी-२० सामने - - २० मार्च - पहिला सामना (दिवस-रात्र)
- २१ मार्च - दुसरा सामना (दिवस-रात्र)
- २४ मार्च - तिसरा सामना