लंडन - दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक कॅलिस फलंदाजीचा सल्लागार म्हणून इंग्लंड संघात सामील होईल. कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसर्या क्रमांकावर असलेला कॅलिस आपल्या नव्या इनिंगसाठी तो सज्ज झाला आहे. जानेवारीत होणाऱ्या श्रीलंका दौर्यासाठी कॅलिस इंग्लंडच्या संघात सामील होईल.
हेही वाचा -मोहम्मद शमीला विश्रांतीचा सल्ला, 'या' दिवशी ऑस्ट्रेलियाहून निघणार
इंग्लंडला श्रीलंकेत दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यानंतर हा संघ भारतात येईल. कॅलिसने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. त्याने दक्षिण आफ्रिका संघाच्या कोचिंग स्टाफकडूनही काम केले आहे.
इंग्लंड संघात कॅलिस मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड आणि सहाय्यक प्रशिक्षक पॉल कॉलिंगवूड, यष्टीरक्षक सल्लागार जेम्स फॉस्टर, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक कार्ल हॉपकिन्सन, गोलंदाजी प्रशिक्षक जॉन लुईस आणि गोलंदाजी सल्लागार जीतन पटेल यांच्याबरोबर काम करणार आहे.
उभय संघात दोन्ही कसोटी सामने गॉल स्टेडियमवर खेळले जातील. पहिली कसोटी १४ जानेवारीपासून आणि दुसरी कसोटी २२ जानेवारीपासून सुरू होईल.