बर्मिंगहॅम - आयसीसी विश्वकरंडकात दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात खेळण्यात आलेल्या सामन्यात हाशिम अमलाने वनडेमध्ये ८ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. आज न्यूझीलंडविरुद्ध खेळताना अमलाने ८३ चेंडूत ५५ धावांची अर्धशतकी खेळी करत त्याने हा टप्पा गाठला. वनडेत ८ हजार धावा पूर्ण करण्यासाठी अमलाला १७६ एकदिवसीय डाव खेळावे लागले.
सर्वांत जलद ८ हजार धावा करण्याचा एबी डिव्हिलियर्सचा विक्रम काढला मोडीत
सर्वांत जलद ८ हजार धावा करण्याच्या यादीत आमला आता दुसऱ्या स्थानी आला आहे. यापूर्वी हा विक्रम एबी डिव्हिलियर्सच्या नावे होता. त्याने १८२ डावांमध्ये ८ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. तर आमलाने हा टप्पा १७६ एकदिवसीय डावांमध्ये पार केला.
या यादीत भारतीय कर्णधार विराट कोहली १७५ डावांसह पहिल्या स्थानी आहे. तर रोहित शर्मा आणि कर्णधार सौरभ गांगुली या यादीत अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत. या दोघांनिही २०० वनडे डावांमध्ये ८ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता.