मुंबई -भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा टी-२० सामना उद्या रविवारी खेळवला जाणार आहे. टी-२० मालिकेत टीम इंडियाने १-० ने आघाडी घेतली आहे. या मालिकेनंतर उभय संघांमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.
हेही वाचा -'पाकिस्तानात न येणाऱ्या लंकेच्या खेळाडूंवर पीएसलकडूनही बंदी घातली पाहिजे'
या कसोटी मालिकेसाठी आफ्रिकेचा कसोटी कर्णधार फाफ डू प्लेसिस भारतात रवाना झाला. मात्र प्रवासादरम्यान त्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. भारतात येण्यासाठी फाफला दुबईला यावे लागणार होते आणि तेथून तो भारतात येणार होता. मात्र, त्याचे विमान दुबईला तब्बल चार तास उशिराने आले. त्यामुळे फाफला पुढे भारताकडे येण्याचे विमान पकडणेही अवघड होऊन बसले. या गोंधळामध्ये फाफचे क्रिकेटचे कीटही विमानात राहिले आहे. या सर्व प्रकारामुळे वैतागलेल्या फाफने ब्रिटिश एअरवेजला ट्विटरवर धारेवर धरले आहे.