लंडन -येथील बफेलो पार्क मैदानावर खेळल्या गेलेल्या १९ वर्षाखालील तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताचा ५ गडी राखून पराभव केला. या सामन्यात आफ्रिकेला विजय मिळाला असला तरी, भारताने ही तीन सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली आहे.
हेही वाचा -...तर धोनी टी-२० वर्ल्डकपसाठी संघात असेल
जोनाथन बर्डच्या नाबाद ८८ धावांच्या खेळीच्या जोरावर आफ्रिकेने हा विजय नोंदवला. बर्डलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्यास आफ्रिकेने प्राधान्य दिले. प्रियम गर्गच्या ५२, तिलक वर्माच्या २५ आणि ध्रूव जुरेलच्या २२ धावांच्या जोरावर भारताने ५० षटकांत ८ बाद १९२ केल्या. आफ्रिकेकडून गोलंदाजीत मोलेस्टोनने २, क्लोएटने २ गडी बाद केले.
धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या आफ्रिकेने पाच गडी गमावले. आफ्रिकेकडून जोनाथन बर्डने नाबाद ८८ तर अँड्यू लोऊने ३१ आणि जॅक लीसने २९ धावा केल्या. भारताकडून गोलंदाजीत यशस्वी जैस्वालने ४१ धावा देत २ गडी बाद केले. अष्टपैलू खेळाडू यशस्वी जयस्वालला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.