पुणे - दक्षिण आफ्रिकेविरुध्दचा पहिला कसोटी सामना भारतीय संघाने २०३ धावांनी जिंकत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघाने या सामन्यात फलंदाजीसह गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. या विजयासह भारतीय संघाने आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत आपले अव्वल स्थान बळकट केले.
आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेतील दुसरा सामना १० ऑक्टोबरपासून पुण्याच्या गहुंजे मैदानात रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ पुण्याला पोहोचले. तेव्हा आपल्या लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी चाहत्यांनी विमानतळाबाहेर मोठी गर्दी केली होती.