जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचा संघ जुलैमध्ये आयर्लंड दौर्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघ तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळतील. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने (सीएसए) ही माहिती दिली.
११ ते २५ जुलै दरम्यान या मालिकेचे सामने खेळविण्यात येणार असून आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा (सीडब्ल्यूसीएसएल) भाग असणार्या तीन एकदिवसीय सामन्यांचा यात समावेश आहे. यासह या मालिकेत तीन टी-२० सामने खेळले जातील. मॅलाहाइड आणि स्टॉर्मोंट येथे सामने खेळले जातील.