लाहोर - पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ लाहोरला पोहोचला आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने ट्विट करत याची माहिती दिली.
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामन्याची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातील पहिला सामना यजमान पाकिस्तान संघाने जिंकला. दुसऱ्या सामन्याला रावळपिंडीमध्ये उद्यापासून (गुरूवार ता. ४) सुरूवात होणार आहे. यानंतर उभय संघात टी-२० मालिका खेळली जाणार आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने युवा खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. हे खेळाडू उभय संघातील मालिकेसाठी लाहोरमध्ये दाखल झाले आहेत.
क्रिकेट आफ्रिकेने या संदर्भात एक ट्विट केले आहे. टचडाऊन लाहोर, दक्षिण आफ्रिकेचा टी-२० संघ पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळण्यासाठी सुरक्षित दाखल झाला आहे, असे ट्विटमधून आफ्रिकेने म्हटलं आहे.