केपटाउन- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने आपला १६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने क्विंटन डी कॉक याच्याकडे सोपविले आहे. तर फाफ डु प्लेसिस आणि कागिसो रबाडा यांना मायदेशात होणाऱ्या या मालिकेसाठी आफ्रिकन संघात परत बोलवले आहे.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ सामन्याची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला २१ फेब्रुवारीपासून सुरूवात होईल. पहिला सामना जोहान्सबर्गच्या मैदानात खेळला जाणार आहे. चेंडू छेडछाड प्रकरणानंतर ऑस्ट्रेलिया प्रथमच दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. उभय संघात टी-२० मालिकेनंतर ३ सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळली जाणार आहे.
दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर डु प्लेसिसने कसोटी आणि टी-२० च्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. तर दुसरीकडे, राबाडाला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती.
असा आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ -