महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कोरोनामुळे दक्षिण आफ्रिकेच्या महिला समलैंगिक खेळाडूने लग्न पुढे ढकललं - लिजेल लीने लग्न पुढे ढकलले

लिजेल ली आफ्रिकी क्रिकेट इतिहासातील पहिली समलैंगिक खेळाडू नाही. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या दोन महिला क्रिकेटपटूंनी लग्न केलं आहे. वेन निकेर्क आणि मॉरीजेन केप या जोडीने जुलै २०१८मध्ये लग्न केले आहे.

South Africa cricketer's wedding puts on hold due to COVID-19 pandemic
कोरोनामुळे दक्षिण आफ्रिकेच्या महिला समलैंगिक खेळाडूने लग्न पुढे ढकललं

By

Published : Apr 3, 2020, 5:54 PM IST

जोहान्सबर्ग- कोरोनामुळे दक्षिण आफ्रिकेची महिला समलैंगिक क्रिकेटपटू लिजेल ली हिने आपले लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. १० एप्रिल रोजी ली आपली समलैंगिक साथीदार तान्झा क्रोन्झे हिच्याशी विवाहबद्ध होणार होती. ली नुकत्यात ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत आफ्रिका संघाची सदस्य होती.

चीनमधील वुहान शहरातून पसरलेला कोरोना विषाणूचा फटका जगातील २०४ देशांना बसला आहे. जगभरातील देशांनी जारी केलेल्या आकडेवारी आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या आकड्यांच्या आधारावर कोरोनामुळे आतापर्यंत ५३ हजार दोनशे ३८ जणांचा बळी गेला आहे. तर दहा लाख १६ हजार ४१३ जणांना या याचा संसर्ग झाला आहे. यामुळे बहुतांश देशांनी लॉकडाऊन केला आहे.

लिजेल ली आफ्रिकी क्रिकेट इतिहासातील पहिली समलैंगिक खेळाडू नाही. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या दोन महिला क्रिकेटपटूंनी लग्न केलं आहे. वेन निकेर्क आणि मॉरीजेन केप या जोडीने जुलै २०१८मध्ये लग्न केले आहे.

दरम्यान, कोरोनामुळे ली आणि तान्झा यांनी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. लग्न पुढे गेल्याने ली आपल्या आई-वडिलांसोबत राहत आहे.

VIDEO: ढल गया दिन, हो गई शाम..! पत्नीसोबत शिखर धवनचा डान्स

लढा कोरोनाविरुद्धचा : मोदींनी विराट, सचिन, रोहित, गांगुलीसह क्रीडाविश्वाला मागितली मदत

ABOUT THE AUTHOR

...view details