जोहान्सबर्ग -आगामी भारताविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने आपल्या टी-२० आणि कसोटी संघाची घोषणा केली आहे. टी-२० मालिकेसाठी फाफ डु प्लेसिसला कर्णधारपदावरुन हटवले गेले आहे.
तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकला कर्णधारपद बहाल केले आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी मात्र, डु प्लेसिस कर्णधारपदी कायम आहे. येत्या सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.
१५ सप्टेंबरला धरमशाला येथे पहिला टी-२० सामना खेळवला जाणार आहे. तर , कसोटीची सुरुवात, २ ऑक्टोबरला विशाखापट्ट्णम येथून होईल.
टी-20 चा संघ -क्विंटन डी कॉक (कर्णधार), रासी वॅनडर डुसेन, टेम्बा बवुमा, ज्युनियर डाला, बजोर्न फॉर्टयुइन, ब्यूरन हेंड्रिक्स, रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, एन्रिक नोर्टजे, अँडिले फेहुलक्वायो, ड्वेन प्रीटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, जोन-जोन स्मुट्स.
कसोटी संघ -फाफ डु प्लेसिस (कर्णधार), टेम्बा बावुमा (उप-कर्णधार), थेयुनिस डी ब्रूयन, क्विंटन डी कॉक, झुबेर हमजा, केशव महाराज, एडन मार्करम, सेनुराह मुथुसामी, लुंगी एनगिडी, एनरिक नोर्टजे, वेर्नॉन फिलेंडर, डेन पिएड्ट, कागिसो रबाडा, रूडी सेकेंड.