नवी दिल्ली -दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज व्हर्नान फिलँडरने निवृत्तीची घोषणा केली आहे. ३४ वर्षीय फिलँडर जानेवारीत अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. नवीन वर्षातील इंग्लंड दौऱ्यांनतर फिलँडर निवृत्ती घेईल.
आफ्रिकेचा 'हा' वेगवान गोलंदाज होणार निवृत्त, जानेवारीत खेळणार अखेरचा सामना
३४ वर्षीय फिलँडर जानेवारीत अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. नवीन वर्षातील इंग्लंड दौऱ्यांनतर फिलँडर निवृत्ती घेईल.
आफ्रिकेचा 'हा' वेगवान गोलंदाज होणार निवृत्त, जानेवारीत खेळणार अखेरचा सामना
हेही वाचा -रोहित नव्हे तर, विराट ठरला यंदाचा सर्वोत्तम फलंदाज
२००७ मध्ये फिलँडरने टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र, त्याला फक्त सात टी-२० सामने खेळता आले. त्याने २०११ मध्ये कसोटी पदार्पण केले. फिलँडरने आतापर्यंत५८ कसोटी सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. या ५८ कसोटी सामन्यांमध्ये फिलँडरच्या नावावर २१४ बळी आहेत. फिलँडरने ३० एकदिवसीय सामन्यांमध्ये ४१ बळी मिळवले असून आफ्रिकेच्या सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये फिलँडरचे नाव घेतले जाते.