महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

गोलंदाज की जादूगर...! सेलिब्रेशन दरम्यान, खिशातील रुमालाने बनवली छडी, पाहा व्हिडिओ - गोलंदाजाने खिशातील रुमालाने बनवली छडी

दक्षिण आफ्रिकेत सध्या मॅझन्सी सुपर लीग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आफ्रिकेचा गोलंदाज तबरेज शम्सीने विहाब लुबेचा बळी घेतला. त्यानंतर त्याने केलेले सेलिब्रेशन हटके ठरले. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ मॅझन्सी सुपर लीगने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

South Africa bowler Tabraiz Shamsi celebrates wicket with magic trick on the field Watch video
गोलंदाज की जादूगर...! सेलिब्रेशन दरम्यान, खिशातील रुमालाने बनवली छडी, पाहा व्हिडिओ

By

Published : Dec 5, 2019, 1:54 PM IST

केपटाऊन - क्रिकेटच्या मैदानात खेळाडू वेगवेगळ्या पध्दतीने 'सेलिब्रेशन' करताना दिसून येतात. पण, दक्षिण आफ्रिकेच्या एका गोलंदाजाने केलेले सेलिब्रेशन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

दक्षिण आफ्रिकेत सध्या मॅझन्सी सुपर लीग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आफ्रिकेचा गोलंदाज तबरेज शम्सीने विहाब लुबेचा बळी घेतला. त्यानंतर त्याने केलेले सेलिब्रेशन हटके ठरले. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ मॅझन्सी सुपर लीगने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

मॅझन्सी सुपर लीगने त्या व्हिडिओला 'विकेट.! आणि शम्सीकडून थोडासी जादूही' असे मजेशीर कॅप्शन दिले आहे. पार्ल रॉक्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा तबरेज शम्सी हा चक्क सेलिब्रेशन करताना जादूगार झाल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या डावाच्या आठव्या षटकात हा प्रकार पाहायला मिळाला.

शम्सीच्या गोलंदाजीवर हिट्सच्या विहाब लुबेने चेंडू टोलावला. तो झेल हार्डस विलजोइनने टिपला आणि लुबेला तंबूत जावे लागले. तेव्हा सेलिब्रेशन करताना शम्सीने आपल्या टी-शर्टमधून एक रुमाल काढला आणि त्यानंतर 'त्या' रुमालातून अचानक एक सिल्व्हर रंगाची दांडी निघाली. शम्सीचा हा जादूगार अवतार पाहून सर्वच चकीत झाले.

दरम्यान, याआधी शम्सी हटके सेलिब्रेशन केल्याने चर्चेत आला होता. त्याने शूज काढून कोणालातरी कॉल करण्याची अ‍ॅक्टींग करत सेलिब्रेशन केले होते.

हेही वाचा -India vs West Indies : वेस्ट इंडीजला थोपविण्यासाठी भारतीय संघाची 'पळापळ', पाहा व्हिडिओ

हेही वाचा -IPL २०२० : मिचेल स्टार्कनंतर 'या' खेळाडूने घेतली आयपीएलमधून माघार

ABOUT THE AUTHOR

...view details