जोहान्सबर्ग - जॉर्ज लिंडे याची अष्टपैलू कामगिरी आणि एडेन मार्करम याची ५४ धावांची खेळी याच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला. या विजयासह आफ्रिकेने चार सामन्याच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली.
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ९ बाद १४० धावा केल्या. यात कर्णधार बाबर आझमने ५० धावांची खेळी केली. बाबर वगळता हाफिजने सर्वाधिक ३२ धावा केल्या. जॉर्ज लिंडेने ४ षटकात २३ धावा देत ३ गडी बाद केले. त्याला विल्यमसने ३ गडी बाद करत चांगली साथ दिली. लिंडेने या सामन्यात तीन झेल टिपले.