नवी दिल्ली -भारताविरूद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघामध्ये आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिसने पुनरागमन केले आहे.
हेही वाचा -
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत भारताला सपाटून मार खावा लागला. आता १२ मार्चपासून आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
आफ्रिकेने या मालिकेसाठी फाफ डु प्लेसिस आणि रसी व्हॅन डू ड्यूसेन यांना संघात स्थान दिले आहे. मागील वर्षी इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या विश्वकरंडक स्पर्धेपासून डु प्लेसिस एकदिवसीय सामने खेळलेला नाही. त्यानंतर त्याने कर्णधारपदही सोडले होते.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना धर्मशाळा येथे खेळला जाईल. दुसरा एकदिवसीय सामना १५मार्चला लखनऊमध्ये तर तिसरा एकदिवसीय सामना १८ मार्च रोजी कोलकाता येथे होईल.
संघ -
क्विंटन डी कॉक (कर्णधार आणि यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा, रसी व्हॅन डू ड्यूसेन, फाफ डु प्लेसिस, काइल वेरीने, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, जॉन-जॉन स्म्ट्स, आंदिले फेहुलक्वायो, लुंगी एनगिडी, लुथो सिपाम्ला, ब्युरन हेंड्रिक्स, एनरिक नोर्टजे, जॉर्ज लिंडे, केशव महाराज