कोलकाता - बीसीसीआय अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने इस्कॉन कोलकाता केंद्रासाठी १० हजार लोकांना अन्न पुरवण्याची मदत दिली आहे. हे केंद्र दररोज सुमारे दहा हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करते. मास्क आणि ग्लोव्ह्ज घालून आलेल्या गांगुलीने इस्कॉनला मदतीची ग्वाही दिली.
दादा सुसाट..१० हजार लोकांच्या जेवणासाठी घेतला पुढाकार
इस्कॉन कोलकाताचे प्रवक्ते आणि उपाध्यक्ष राधारमण दास म्हणाले, “आम्ही दररोज दहा हजार लोकांना स्वयंपाक करत होतो. गांगुलीने आम्हाला मदत केली आणि आता आम्ही दररोज २० हजार लोकांना भोजन देत आहोत.”
इस्कॉन कोलकाताचे प्रवक्ते आणि उपाध्यक्ष राधारमण दास म्हणाले, “आम्ही दररोज दहा हजार लोकांना स्वयंपाक करत होतो. गांगुलीने आम्हाला मदत केली आणि आता आम्ही दररोज २० हजार लोकांना भोजन देत आहोत.”
गांगुलीने यापूर्वी रामकृष्ण मिशनचे मुख्यालय बेलूर मठ येथे २० हजार किलो तांदूळ दान केले. दास म्हणाले, “मी दादांचा खूप मोठा चाहता आहे आणि मी क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या अनेक खेळ्या पाहिल्या आहेत. भुकेलेल्यांना खायला देण्याची त्याची ही खेळी सर्वोत्कृष्ट आहे. आम्ही त्यांचे आभार मानतो.”