महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

धोनीच्या निवृत्तीबद्दल सौरव गांगुली म्हणाला...

धोनीबद्दल निवड समिती काय विचार करते हे मला जाणून घ्यायचे आहे. मी त्यांच्याशी २४ तारखेला भेटणार आहे. यानंतर मी धोनीच्या विषयावर माझे मत मांडेन. धोनीला नेमके काय अपेक्षित आहे हे देखील आपल्याला पाहावे लागणार आहे. यासंदर्भात मी त्याच्याशीही चर्चा करणार, असल्याचे धोनी म्हणाला.

धोनीच्या निवृत्तीबद्दल सौरव गांगुली म्हणाला...

By

Published : Oct 17, 2019, 12:17 PM IST

Updated : Oct 17, 2019, 12:55 PM IST

कोलकाता- बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक २३ ऑक्टोबरला होणार असून या निवडणुकीसाठी सौरव गांगुलीचा एकमात्र अर्ज आहे. यामुळे गांगुलीची निवड निश्चित आहे. गांगुली अध्यक्षपदाची सुत्रे २३ ऑक्टोबरला हाती घेणार आहे. या पदाचा कार्यभार सांभाळण्याआधी गांगुलीने धोनीच्या निवृत्तीबद्दल एक मोठं विधान केले आहे.

धोनीबद्दल निवड समिती काय विचार करते हे मला जाणून घ्यायचे आहे. मी त्यांच्याशी २४ तारखेला भेटणार आहे. यानंतर मी धोनीविषयावर माझे मत मांडेन. धोनीला नेमके काय अपेक्षित आहे हे देखील आपल्याला पाहावे लागणार आहे. यासंदर्भात मी त्याच्याशीही चर्चा करणार, असल्याचे धोनी म्हणाला.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सुत्र हाती घेण्यापूर्वी गांगुलीचा बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा सत्कार सोहळा ईडन गार्डनच्या मैदानावर असलेल्या सीएबीच्या मुख्यालयात रंगला होता. यावेळी पत्रकारांशी गांगुलीने संवाद साधला. यावेळी गांगुली म्हणाला, 'धोनीबद्दल आतापर्यंत नेमक्या काय घडामोडी घडल्या आहेत, याची मला माहिती नाही. पण मी आता यात लक्ष घालू शकेन'

दरम्यान, बांगलादेश विरुध्दच्या आगामी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा २४ तारखेला होणार आहे. याचवेळी गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष या नात्याने निवड समितीशी चर्चा करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या क्रिकेट प्रशासकिय समितीच्या हाताखाली कारभार चालवल्यानंतर, बीसीसीआयला गांगुलीच्या रुपाने पहिल्यांदा नवीन अध्यक्ष मिळणार आहे. लोढा समितीने दिलेल्या शिफारसींनुसार बीसीसीआयच्या कारभारात मोठे बदल करण्यात आले आहेत.

हेही वाचा -#HBD KALLIS : ...'या' कारणामुळे जॅक कॅलिस ६५ नंबरची जर्सी घालत होता

हेही वाचा -सुपर ओव्हरच्या 'नवीन' नियमावर सचिन म्हणाला....

Last Updated : Oct 17, 2019, 12:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details