मुंबई- माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली धोनीच्या भविष्याबाबत बोलताना म्हणाला, भारताने विश्वकरंडक स्पर्धा जिंकली आणि धोनीने निरंतर चांगले प्रदर्शन केल्यास त्याला निवृत्त होण्याची गरज नाही. जर कोणी प्रतिभावान असेल तर त्याच्या वयाचा मुद्दा पुढे करण्यात काही अर्थ नाही.
२०१९ सालच्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर धोनी संघात खेळू शकतो - सौरव गांगुली
भारताने विश्वकरंडक स्पर्धा जिंकली आणि धोनीने निरंतर चांगले प्रदर्शन केल्यास त्याला निवृत्त होण्याची गरज नाही. जर कोणी प्रतिभावान असेल तर त्याच्या वयाचा मुद्दा पुढे करण्यात काही अर्थ नाही.
गांगुलीने सध्याच्या भारतीय संघाबाबत बोलताना म्हणाला, सध्या भारताची वेगवान गोलंदाजी शानदार आहे. विश्वकरंडकात मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांची जोडी महत्वाची भूमिका बजावेल. बुमराह असो किंवा शमी भारतीय गोलंदाज निरंतर चांगले प्रदर्शन करत आहे. इंग्लंडच्या वातावरणात भारताचे गोलंदाज महत्वपूर्ण भूमिका बजावतील.
सध्या सलामीवीर शिखर धवन खराब फॉर्मात असला तरीही रोहित शर्मासोबत शिखरनेच सलामीला आले पाहिजे, असे मत गांगुलीने मांडले आहे. गांगुली म्हणाला, तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीनेच मैदानावर आले पाहिजे. चौथ्या क्रमांकावर रायुडु आणि त्यानंतर धोनी आणि केदार जाधव यांनी फलंदाजीसाठी मैदानात यावे. विजय शंकरच्या चांगल्या प्रदर्शनामुळे रविंद्र जडेजाऐवजी विश्वकरंडकात संघात स्थान देण्यात येवू नये, असेही गांगुली म्हणाला.