मुंबई- इंग्लंड येथे यावर्षी क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी अनेकांनी इंग्लंड आणि भारत या संघांना विजयाचे प्रबळ दावेदार मानले आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही यावर मत मांडताना भारत जगातील सर्वात मजबूत संघ असून विजयाचा प्रबळ दावेदार आहे, असे म्हटले आहे.
भारतीय संघ विश्वकरंडक जिंकू शकतो. गेल्या ६-७ महिन्यापासून भारतीय संघाने चांगले प्रदर्शन केले आहे. भारतीय संघ विश्वकरंडकासाठी पूर्णपणे तयार आहे. प्रत्येकजण चांगली कामगिरी करत आहे. सध्याचा भारतीय संघ सर्वश्रेष्ठ आहे, असे गांगुली म्हणाला.