नवी दिल्ली - मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पराभव झाल्यानंतर चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी मोठी चर्चा होत आहे. ते कोडे सोडविण्यासाठी क्रिकेट समीक्षक आणि माजी खेळाडू पर्यायी खेळाडूंची नावे सुचवित आहेत. यात माजी कर्णधार सौरव गांगुलीने कसोटी संघाचा सदस्य चेतेश्वर पुजारा हा सध्याच्या घडीला सर्वोत्तम पर्याय असून त्याला संधी देण्याचा सल्ला दिला आहे.
पुजारा चौथ्या क्रमांकासाठी सर्वोत्तम पर्याय; त्याला संधी द्या, दादाचा सल्ला - cheteshwar pujara
काही वेळा एकदिवसीय क्रिकेटमध्ये तुम्हाला फलंदाजीमध्ये स्थैर्य हवे असते, पुजारा ते स्थैर्य तुम्हाला देऊ शकतो. ज्या प्रमाणे राहुल द्रविड याआधी भारतीय वन-डे संघात महत्वाची भूमिका बजावत होता, त्याचप्रमाणे पुजाराही भूमिका बजावू शकतो, असे सौरव गांगुलीने म्हटले आहे.
गांगुली म्हणाला, पुजाराचे क्षेत्ररक्षण ढिसाळ असले तरीही तो एक चांगला फलंदाज आहे. अनेकांना हा पर्याय योग्य वाटणार नाही. काही लोक यावर हसतीलही. मात्र, तुम्हाला संघात एका चांगल्या आणि तंत्रशुद्ध फलंदाजांची गरज आहे, तर सध्या उपलब्ध असलेल्या पर्यायांपेक्षा पुजारा या जागेसाठी योग्य उमेदवार ठरतो.