महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'धोनीच्या निवृत्तीवर दादाचं 'मोठं' विधान', म्हणाला.. - महेंद्रसिंह धोनी निवृत्ती न्यूज

'सगळंच स्पष्ट झालं आहे. परंतु, काही गोष्टी सांगता येत नाहीत. धोनीबद्दलही सर्व स्पष्ट आहे. काही कालावधीनंतर, तुम्हालाही कळेल. बोर्ड, धोनी आणि निवडकर्ता यांच्यात पारदर्शकता आहे. काय होते ते पाहू. अजूनही वेळ आहे. अर्थात, हे सर्व तीन महिन्यांच्या आत स्पष्ट होईल', असे गांगुलीने म्हटले आहे.

sourav ganguly made a big statement on dhoni's retirement
'धोनीच्या निवृत्तीवर दादाचं 'मोठं' विधान', म्हणाला..

By

Published : Nov 30, 2019, 6:03 PM IST

मुंबई -भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना परत एकदा उधाण आलं आहे. धोनीच्या निवृत्तीवर अनेक दिग्गज व्यक्तींनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही धोनीच्या निवृत्तीबद्दल मत मांडले होते. आता खुद्द बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने धोनीच्या निवृत्तीवर मोठं वक्तव्य केलं आहे.

हेही वाचा -हसन अली श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर

'सगळंच स्पष्ट झालं आहे. परंतु, काही गोष्टी सांगता येत नाहीत. धोनीबद्दलही सर्व स्पष्ट आहे. काही कालावधीनंतर, तुम्हालाही कळेल. बोर्ड, धोनी आणि निवडकर्ता यांच्यात पारदर्शकता आहे. काय होते ते पाहू. अजूनही वेळ आहे. अर्थात, हे सर्व तीन महिन्यांच्या आत स्पष्ट होईल', असे गांगुलीने म्हटले आहे.

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर धोनी क्रिकेटपासून लांब आहे. तो विश्वकरंडकानंतर निवृत्ती घेणार अशा चर्चां रंगल्या होत्या. मात्र, त्याने निवृत्ती घेणार की पुनरागमन करणार याबाबत कोणतेही भाष्य केले नव्हते. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात जानेवारीपर्यंत काहीही विचारू नका, असे सांगितले आहे.

धोनीने विश्वकरंडक स्पर्धेतील न्यूझीलंड विरुध्दच्या सामन्यानंतर एकही क्रिकेटचा सामना खेळलेला नाही. भारतीय संघाने विश्वकरंडक स्पर्धेनंतर तीन देशांविरुध्द मालिका खेळल्या आहेत. धोनीने वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश विरुध्दच्या मालिकांमधून माघार घेतली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details