मुंबई -ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघावर टीकेची झोड उठली आहे. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यासमोर भारताचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांत आटोपला. या पराभवानंतर भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी भारतीय संघाच्या मदतीसाठी राहुल द्रविडला ऑस्ट्रेलियात पाठवण्याची विनंती बीसीसीआयकडे केली. या मागणीला राजीव शुक्ला यांनी उत्तर दिले आहे.
काय म्हणाले शुक्ला
एएनआयशी बोलताना शुक्ला यांनी सांगितलं की, 'भारतीय संघाने पहिल्या डावात चांगली कामगिरी केली. यामुळे भारतीय संघाला पहिल्या डावात आघाडीदेखील मिळाली. पण दुसऱ्या डावात आपला डाव कोसळला. हे क्रिकेट आहे. यामध्ये अशा गोष्टी होत असतात. यातून बाहेर यावं लागेल आणि चांगला खेळ करावा लागेल. आपले खेळाडू नक्कीच यातून बाहेर पडून पुनरागमन करू शकतील, यामुळे सद्या कोणीही ऑस्ट्रेलियाला जात नाहीये.'