कोलकाता -भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष (बीसीसीआय) आणि माजी कर्णधार सौरभ गांगुलीने बुधवारी रामकृष्ण मिशनचे मुख्यालय बेलूर मठ गाठले. गांगुलीने सुमारे २५ वर्षानंतर या मठात उपस्थिती नोंदवली. कोरोना व्हायरसमुळे अडचणीत आलेल्यांना मदत करण्यासाठी गांगुलीने २ हजार किलो तांदूळ दान केले आहेत.
इथेही ‘दादा’च!...तब्बल २ हजार किलो तांदूळ दान
गांगुलीने ट्विटरवरुन ही माहिती दिली. २५ वर्षांनंतर मी बेलूर मठात आलो आहे. मी येथे गरजूंना २ हजार किलो तांदूळ दिले, असे गांगुलीने म्हटले आहे. यापूर्वी दादाने कोरोनाविरूद्ध लढा देण्यासाठी ५० लाख रुपयांचे तांदूळ देण्याची घोषणा केली होती. लोकांना घरी सुरक्षित राहण्याचे आवाहनही त्याने केले.
गांगुलीने ट्विटरवरून ही माहिती दिली. २५ वर्षांनंतर मी बेलूर मठात आलो आहे. मी येथे गरजूंना २ हजार किलो तांदूळ दिले, असे गांगुलीने म्हटले आहे. यापूर्वी दादाने कोरोनाविरूद्ध लढा देण्यासाठी ५० लाख रुपयांचे तांदूळ देण्याची घोषणा केली होती. लोकांना घरी सुरक्षित राहण्याचे आवाहनही त्याने केले.
दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे संपूर्ण देश २१ दिवसासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. बीसीसीआयने यामुळे २९ मार्चपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलचा तेरावा हंगाम रद्द करण्यात आला आहे. बीसीसीआयने अद्याप याची घोषणा केलेली नाही.