मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या नेतृत्वात महेंद्रसिंह धोनीने पदार्पण केले. जर धोनी सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत राहिला असता, तर तो महान खेळाडू झाला नसता, असे मत गांगुलीने दिले आहे. धोनीने १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
गांगुली म्हणाला, "विशाखापट्टणममध्ये धोनीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्याने शतक ठोकले. जेव्हा त्याला अधिक षटके खेळण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने मोठी धावसंख्या बनवली. तेंडुलकर सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत राहिला असता तर, तो 'तेंडुलकर' बनला नसता. कारण त्या क्रमांकावर आपल्याला मुठभर चेंडू खेळायला मिळतात.''
गांगुली पुढे म्हणाला, ''ही चॅलेंजर ट्रॉफी होती. त्याने माझ्या संघासाठी शतक झळकावत फलंदाजीमध्ये डावाची सलामी दिली, त्यामुळे मला माहित होते की तो अव्वल क्रमांकावरही चांगली कामगिरी करू शकतो. जेव्हा आपण एखाद्या खेळाडूला बढती देतो तेव्हा एखादा खेळाडू तयार होतो. आपण त्याला खाली ठेऊन चांगला खेळाडू बनवू शकत नाही."
''माझा नेहमी असा विश्वास आहे की ड्रेसिंग रूममध्ये बसून आपण एक महान क्रिकेटपटू बनू शकत नाही. क्षमतांप्रमाणेच, विशेषत: षटकार मारण्याची कला त्याच्यामध्ये फारच कमी होती. त्याने आपल्या कारकिर्दीच्या शेवटी बदल केला. परंतू धोनी जेव्हा परिपक्व नव्हता, तेव्हा त्याला मुक्त करणे खूप महत्वाचे होते. मी निवृत्त झाल्यावर धोनीने वर फलंदाजी करावी, असे मत मी खूप वेळा मांडले आहे'', असेही गांगुलीने सांगितले.