महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'माही तुझी कामगिरी जग विसरणार नाही'....कोहलीची भावनिक पोस्ट तर सौरव गांगुलीकडून शुभेच्छा - सौरव गांगुली न्यूज

'माही तुझी कामगिरी जग विसरणार नाही'... अशा शब्दात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने धोनीच्या निवृत्तीवर भावनिक पोस्ट लिहीली आहे. धोनीची निवृत्ती म्हणजे एका युगाची समाप्ती आहे, अशा भावना माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने म्हटले आहे.

sourav ganguli and virat kohli
सौरव गांगुली आणि विराट कोहली

By

Published : Aug 16, 2020, 2:24 AM IST

मुंबई- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीनंतरच्या पुढील आयुष्यासाठी क्रिकेट विश्वातून धोनीला शुभेच्छा दिल्या जात आहेत. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीने धोनीला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

विराट कोहलीची इंन्स्टाग्राम पोस्ट

विराट कोहलीने इंस्टाग्रामवर पोस्ट लिहून धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. 'प्रत्येक खेळाडूचा क्रिकेटचा प्रवास एक दिवस संपत असतो. मात्र, जेव्हा तुमच्या जवळचा कोणी निवृत्ती जाहीर करतो, तेव्हा तुम्ही जास्त भावनिक होता. तु देशासाठी जे काही केले आहे, ते प्रत्येकाच्या हृदयात कायमच राहील. मात्र, तुझ्याकडून मिळालेला आदर आणि प्रेम निरंतर माझ्यामध्ये राहील. जगाने तुझे यश पाहिले आहे. मात्र, मी तुझ्यातील माणसाला पाहिले आहे, असे म्हणत कोहलीने धोनीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीनेही धोनीला पुढील आयुष्यासाठी इंस्टाग्रामवरून शुभेच्छा दिल्या आहेत.' तुझी निवृत्ती म्हणजे एका युगाची समाप्ती आहे. देशासाठी आणि जगासाठी तू एक उत्तम अफलातून खेळाडू होतास. तुझ्यातील नेतृत्त्वगुण आणि हुशारी सर्वांसमोर आली. विशेषतहा: कमी षटकांच्या खेळात तुझे नेतृत्वगुण सर्वांनी पाहिले. प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट होता. त्यातीही ही घटना सर्वोत्तम आहे. यष्टीरक्षकांसाठी धोनीने नवा धडा घालून दिला आहे. धोनी तुझे करिअर सर्वोत्तम राहिले, तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असे ट्विट सौरव गांगुलीने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details