महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

NZ VS BAN: शाकिब उल हसन आउट, सौम्य सरकार इन

शाकिब खेळणार नसल्याने त्याच्या जागी सौम्यची निवड झाली आहे. शाकिबला बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये ढाका डायनामाइट्स आणि कोमिला विक्टोरियंसच्या सामन्यात दुखापत झाली होती.

सौम्य सरकार

By

Published : Feb 21, 2019, 10:09 PM IST

ढाका - न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी सौम्य सरकारची बांगलादेशच्या संघात निवड करण्यात आली आहे. अष्टपैलू शाकिब उल हसन याच्या बोटाला दुखापत झाल्याने तो पहिला कसोटी सामना खेळू शकणार नाही. सौम्यने त्याचा शेवटचा सामना विंडीजविरुद्ध मायदेशात खेळला होता. त्यात त्याने ३० धावा केल्या.

शाकिब खेळणार नसल्याने त्याच्या जागी सौम्यची निवड झाली आहे. शाकिबला बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये ढाका डायनामाइट्स आणि कोमिला विक्टोरियंसच्या सामन्यात दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही खेळू शकला नाही. या मालिकेत न्यूझीलंडने बांगलादेशचा ३-० असा दारुण पराभव केला.

शाकिब केवळ पहिल्या कसोटीत खेळणार नाही. उर्वरित दोन्ही कसोटी सामन्यासाठी तो उपलब्ध असेल. न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात ३ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. यातील पहिला कसोटी सामना २८ फेब्रुवारीला हॅमिल्टन येथे होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details