लंडन -इंग्लिश काऊंटी क्रिकेट क्लब सोमरसेटने दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज व्हर्नान फिलँडरसोबतचा करार रद्द केला आहे. फिलँडर या वर्षाच्या सुरुवातीला सोमरसेटमध्ये दाखल झाला. तो एप्रिलमध्ये क्लबकडून खेळणार होता. परंतू कोरोना व्हायरसमुळे इंग्लंडमधील सर्व प्रकारचे क्रिकेट क्रियाकलाप पुढे ढकलण्यात आले आहेत.
काऊंटी क्लब सोमरसेट आणि फिलँडर यांच्यातील करार रद्द - Somerset and philander contract cancels news
क्रिकेटचे सोमरसेट डायरेक्टर अँडी हॅरी म्हणाले, "सर्व क्लबसाठी हा अत्यंत अनिश्चित आणि आव्हानात्मक काळ आहे. 1 जुलैपर्यंत क्रिकेट होण्याची शक्यता नाही. सध्याची परिस्थिती समजणार्या व्हर्नानचे मी आभार मानू इच्छितो. आम्ही परस्पर सहमतीच्या आधारे या निष्कर्षावर आलो आहोत. आशा आहे की तो पुन्हा सोमरसेटला परत येईल."

या वर्षी फिलँडरने इंग्लंडविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले आहे. फिलँडरने या सामन्यापूर्वी आपल्या देशासाठी 97 सामने खेळले असून यात त्याने 261 बळी घेतले आहेत. त्याने 2011 मध्ये पदार्पण केले होते.