दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज (मंगळवार) २०१९ मधील सर्वोत्तम एकदिवसीय आणि टी-२० खेळाडूंच्या संघाची घोषणा केली. या दोनही संघात भारताच्या स्मृती मानधनाचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, स्मृतीसह भारताच्या सहा खेळाडूंचा समावेश या संघात आहे.
मराठमोळ्या स्मृतीचा सन्मान, आयसीसीच्या एकदिवसीय अन् टी-२० संघात मिळालं स्थान - Smriti Mandhana in ICCs ODI and T20 team of the year
आयसीसीने २०१९ च्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगकडे सोपवण्यात आले आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या एलिसा पेरीने एकदिवसीय आणि अॅलिसा हिलीने टी-२० तील सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावला.
आयसीसीने महिला खेळाडूंच्या वर्षभरातील प्रदर्शनावर सर्वोत्तम संघ निवडला. एकदिवसीय संघात भारताच्या स्मृती मानधना, शिखा पांडे, झुलन गोस्वामी आणि पूनम यादव यांचा समावेश आहे. तर टी-२० संघात स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, राधा यादव यांनी आपल्या दमदार कामगिरीने जागा पटकावली आहे. आयसीसीच्या २०१९ मधील एकदिवसीय आणि टी-२० संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगकडे सोपवण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या एलिसा पेरीने एकदिवसीय आणि अॅलिसा हिलीने टी-२० तील सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावला. तर सर्वोत्तम खेळाडू एलिसा पेरी ठरली. उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार थायलंडच्या चनिदा सथिरुंगने पटकावला.
- आयसीसीचा एकदिवसीय संघ -
- मेग लॅनिंग, कर्णधार (ऑस्ट्रेलिया), अॅलिसा हिली ( ऑस्ट्रेलिया), स्मृती मानधना ( भारत), तम्सीन बीयूमोंट ( इंग्लंड), स्टेफनी टेलर ( वेस्ट इंडीज), एलिसा पेरी ( ऑस्ट्रेलिया), जेस जोनासेन ( ऑस्ट्रेलिया ), शिखा पांडे ( भारत), झुलन गोस्वामी ( भारत), मीगन स्कट ( ऑस्ट्रेलिया), पूनम यादव ( भारत).
- आयसीसीचा टी-२० संघ -
अॅलिसा हिली ( ऑस्ट्रेलिया), डॅनिएल वॅट ( इंग्लंड), मेग लॅनिंग, कर्णधार ( ऑस्ट्रेलिया), स्मृती मानधना ( भारत), लिझली ली ( दक्षिण आफ्रिका), एलिसा पेरी ( ऑस्ट्रेलिया), दीप्ती शर्मा ( भारत), निदा दार ( पाकिस्तान), मीगन स्कट ( ऑस्ट्रेलिया), शबनीम इस्मैल ( दक्षिण आफ्रिका), राधा यादव ( भारत).