मँचेस्टर - मोहम्मद रिझवानच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या क्रिकेट कसोटीच्या दुसर्या दिवशी ९ बाद २२३ धावा केल्या आहेत. अंधूक प्रकाशामुळे चहापानानंतर खेळ थांबवण्यात आला. खेळ थांबला तेव्हा नसीम शाह १ आणि रिझवान ६० धावांवर खेळत होते. या कसोटीत नाणेफेक जिंकून पाकिस्तानने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
ENGvsPAK : दुसऱ्या दिवसअखेर पाकिस्तानच्या ९ बाद २२३ धावा - england vs pakistan match report
पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ ९० मिनिटे उशिरा सुरू झाला. पाकिस्तानने कालच्या ५ बाद १२६ धावांवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. स्टार फलंदाज बाबर आझम (४७) बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा डाव दोनशे आत गारद होईल असे वाटत होते. मात्र, रिझवानने संघाची कमान आपल्या हाती घेतली. त्याने ५ चौकारांसह ६० धावांची नाबाद खेळी केली. दुसऱ्या बाजूने त्याला एकाही फलंदाजाची चांगली साथ लाभली नाही. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडने प्रत्येकी ३ तर, सॅम करन आणि ख्रिस वोक्सने प्रत्येकी एक बळी घेतला.

तीन सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना गमावल्यानंतर पाकिस्तान १-० ने पिछाडीवर आहे. दहा वर्षांनंतर पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्याच्या उद्देशाने इंग्लंडचा संघ मैदानात उतरला आहे.