महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

SL VS SA : श्रीलंकेच्या पहिल्या दिवसाअखेर ६ बाद ३४० धावा; चंदीमल, डी सिल्वा यांची अर्धशतकं - श्रीलंका वि. दक्षिण आफ्रिका स्कोर न्यूज

श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी सामना सेंचुरियन येथील मैदानावर खेळला जात आहे. श्रीलंका संघाने या सामन्यात पहिल्या दिवसाअखेर ८५ षटकात ६ बाद ३४० धावा केल्या आहेत.

SL VS SA TEST : Sri Lanka go to stumps on day one at 340/6
SL VS SA : श्रीलंकेच्या पहिल्या दिवसाअखेर ६ बाद ३४० धावा; चंदीमल, डी सिल्वा यांची अर्धशतकं

By

Published : Dec 26, 2020, 9:48 PM IST

सेंचुरियन - श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी सामना सेंचुरियन येथील मैदानावर खेळला जात आहे. श्रीलंका संघाने या सामन्यात पहिल्या दिवसाअखेर ८५ षटकात ६ बाद ३४० धावा केल्या आहेत. एकवेळ ३ बाद ५४ अशी अवस्था झाल्यानंतर दिनेश चंदीमल आणि धनंजया डी सिल्वा यांनी लंकेचा डाव सावरला.

श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा दिमूख करूणरत्ने (२२), कुशल परेरा (१६) आणि कुशल मेडिस (१२) ठराविक अंतराने बाद झाले. यानंतर दिनेश चंडीमल आणि डी सिल्वा या जोडीने लंकेचा डाव सावरला. दोघांनी अर्धशतकं झळकावली.

डी सिल्वा ७९ धावांवर रिटायर्ट हर्ट झाला. तर चंदीमल ८५ धावांवर बाद झाला. हे दोघे बाद झाल्यानंतर यष्टीरक्षक निरोशान याने एक बाजू पकडून ठेवत ४९ धावा केल्या. दिवसाअखेर दुशान शनाका २५ तर कुशन रजिंथा ७ धावांवर खेळत आहेत. आफ्रिकेकडून विआन मुल्डर ३, लुथो सिपमला, लुंगी एनगिडी, एनरिक नार्टिजे यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

हेही वाचा -Boxing Day Test : लाबूशेन याने केलं भारतीय गोलंदाजांचे कौतूक, म्हणाला...

हेही वाचा -IND Vs AUS : विराट भारतात मन मात्र ऑस्ट्रेलियात; पहिल्या दिवसाच्या खेळावर दिली 'ही' प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details