माउंट माउंगानुई - पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा पहिला डाव ४३१ धावांवर आटोपला. केन विल्यमसनने कर्णधाराला साजेशी खेळी करत शतक झळकावले. यानंतर पाकिस्तानने दुसऱ्या दिवसाअखेर १ बाद ३० धावा केल्या आहेत. अबिद अली १९ तर मोहम्मद अब्बास शुन्यावर नाबाद खेळत आहे.
पहिल्या दिवशी न्यूझीलंडने ३ बाद २२२ केल्या होत्या. केन विल्यमसन ९४ धावा काढून नाबाद होता. त्याने आज दुसऱ्या दिवशी शतक पूर्ण केले. त्याचा अडथळा फिरकीपटू यासिर शाहने दूर केला. विल्समसनने १२९ धावा केल्या. विल्समसनआधी हेन्री निकोलस बाद झाला. त्याने १३७ चेंडूत ५६ धावांची खेळी केली.
विल्समसन बाद झाल्यानंतर बी. जे वाटलिंग याने ७३ धावांची खेळी करत संघाला ४०० चा टप्पा ओलांडून दिला. जेमिसन याने ३२ धावा करत वाटलिंग याला चांगली साथ दिली. दोघांनी ६६ धावांची भागिदारी केली. नील वेग्नर याने १९ धावा केल्या. तर ट्रेंट बोल्ट ८ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने ४, यासिर शाहने ३ गडी बाद केले. तर मोहम्मद अब्बास, फहीम अशरफ, नसीम शाह यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला. शान मसूदला (१०) जेमिसनने माघारी धाडले.
हेही वाचा -AUS VS IND : अजिंक्य रहाणेच्या खेळीचे स्टार्कने केले कौतूक, म्हणाला...
हेही वाचा -AUS VS IND : ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक लँगर यांनी दिले वॉर्नरविषयी मोठे अपडेट