ठाणे -मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित ४२ व्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेला दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सुरुवात झाली. माजी रणजी खेळाडू राजेश सुतार यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
एन. टी. केळकर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा: सिंघानिया हायस्कूलचा दणदणीत विजय - thane
माजी रणजी खेळाडू राजेश सुतार यांच्या हस्ते झाले स्पर्धेचे उद्घाटन
यावेळी स्पर्धेचे आयोजक आमदार संजय केळकर, आंतरराष्ट्रीय कसोटी पंच पिलू रिपोर्टर, प्रा. सुयश प्रधान, स्पोर्टिंग क्लबचे राजू केळकर, मराठे सर, संस्थेचे चिटणीस बाळा खोपकर आदी उपस्थित होते.
या स्पर्धेतील पहिला सामना सिंघानिया हायस्कूल व युरो हायस्कूल यांच्यात खेळला गेला. या सामन्यात युरो हायस्कूलच्या सर्वबाद ६८ केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सिंघानिया हायस्कूलने ९ गडी राखून युरो हायस्कूलवर दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात शिवम शाळीग्रामने ३ धावा देऊन ४ गडी बाद केले.