मोहाली- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मोहाली येथील बिंद्रा स्टेडियम येथे चौथा एकदिवसीय सामना रंगणार आहे. रांची येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघाला मेजवानी दिली होती. झिराकपूर, मोहाली येथे राहणाऱ्या सिद्धार्थ कौलने भारतीय संघाला मेजवानी दिली आहे.
महेंद्रसिंह धोनीनंतर 'या' खेळाडूने भारतीय संघाला दिली मेजवानी
रांची येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघाला मेजवानी दिली होती. झिराकपूर, मोहाली येथे राहणाऱ्या सिद्धार्थ कौलने भारतीय संघाला मेजवानी दिली आहे.
सिद्धार्थ कौलने शनिवारीच गर्लफ्रेन्ड हरसिमरनसोबत लग्न केले आहे. भारतीय संघ सध्या मोहाली येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी पोहचला आहे. सिद्धार्थ कौलने भारतीय संघाला शनिवारी रात्री जेवण्यासाठी आमंत्रित केले होते. जेवण झाल्यानंतर सिद्धार्थने पत्नी हरसिमरन आणि भारतीय संघातील सहकारी खेळाडूंसोबत फोटो काढला.
सिद्धार्थच्या लग्नाबद्दलची माहिती सनरायझर्स हैदराबादने ट्विट करत दिली होती. सिद्धार्थ कौल आयपीएलमध्ये हैदराबाद संघाकडून खेळतो. आतापर्यंत सिद्धार्थने ३८ सामने खेळताना ४३ गडी बाद केले आहेत.