त्रिनीदाद -भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलने वेस्ट इंडिज 'अ' विरुद्धच्या कसोटी सामन्यात एक विक्रम रचला. गिल हा फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. हा विक्रम करताना त्याने भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला मागे टाकले.
आधी गंभीर, आता गिल...२००२ चा विक्रम काढला मोडीत - २००२ चा विक्रम
ब्रायन लारा स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारत 'अ' संघाकडून खेळताना शुभमनने नाबाद २०४ धावा ठोकल्या.
ब्रायन लारा स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारत 'अ' संघाकडून खेळताना शुभमनने नाबाद २०४ धावा ठोकल्या. हा विक्रम करताना शुभमनचे वय १९ वर्ष आणि ३३४ दिवस एवढे होते. २००२ मध्ये बोर्ड प्रेसिडेंट इलेवनकडून खेळताना गंभीरने द्विशतक केले होते. त्यावेळी गंभीरचे वय २० वर्ष आणि १२४ दिवस एवढे होते.
या सामन्याच्या पहिल्या डावात, गिल हा खाते न उघडताच बाद झाला होता. दुसऱ्या डावात मात्र, गिलने ही कसर भरुन काढली. गिलने केलेल्या या खेळीमध्ये त्याने १९ चौकार आणि २ षटकार लगावले आहेत. भारत 'अ' संघाने आपला दुसरा डाव, ३६५ धावांवर घोषित केला. आणि वेस्ट इंडिज संघाला ३७३ धावांचे लक्ष्य दिले आहे.