ख्राईस्टचर्च -भारत 'अ' संघाचा स्टार फलंदाज शुबमन गिलने न्यूझीलंड 'अ' विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात २०४ धावांची दमदार खेळी साकारली. शुबमनच्या खेळीमुळे भारताला ही कसोटी बरोबरीत राखण्यात यश आले आहे.
हेही वाचा -पाकिस्तानचा खेळाडू म्हणतो, 'भारताशी सामना म्हणजे...'
रविवारी या कसोटीच्या शेवटच्या दिवशी गिलने दुहेरी शतक नोंदवले. त्याने आपल्या खेळीत २२ चौकार व ४ षटकार ठोकले. शुबमनला हनुमा विहारीची चांगली साथ लाभली.
भारताने पहिल्या डावात २१६ धावा केल्या होत्या. या डावात शुबमनने ८३ धावांची खेळी केली. त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात ७ बाद ५६२ धावांचा डोंगर उभारत ३४६ धावांची आघाडी घेतली. दुसर्या डावात भारतीय संघाने ३ बाद ४४८ धावा करत सामना अनिर्णित सोडवला. मागील वर्षी गिलने वेस्ट इंडीज 'अ' संघाविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दुहेरी शतक झळकावले होते.