मुंबई -टीम इंडियाचा 'कॅप्टन कुल' महेंद्रसिंह धोनी क्रिकेटपासून दूर असला तरी श्रेयस अय्यरच्या निमित्ताने त्याची पुन्हा आठवण झाली. नुकत्याच पार पडलेल्या पंजाबविरूद्धच्या सामन्यात मुंबईकडून खेळताना अय्यरने 'हेलिकॉप्टर शॉट' लगावत चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. त्याचा हा फटका पाहून समालोचकांनाही मैदानात धोनी असल्याचा भास झाला.
हेही वाचा -AFG vs WI : १४० किलो वजनी रहकिमची 'वजनदार' कामगिरी; अफगाणिस्तान पराभवाच्या छायेत