मुंबई -महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे शनिवारी निदान झाले. यानंतर त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना देखरेखीसाठी आयसोलशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या ट्विटर हँडलवरून तब्येतीची माहिती दिली जाणार असल्याचे नानावटी रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह, पाकिस्तानच्या शोएब अख्तरने केली प्रार्थना - cricket fraternity on amitabh bachchan
बिग बी व्यतिरिक्त अभिषेक बच्चनचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अमिताभला कोरोना झाल्याची बातमी व्हायरल झाल्यानंतर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन यांना बरे वाटावे, यासाठी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही प्रार्थना केली आहे.

''गेट वेल सून बच्चनजी, तुम्ही लवकर बरे व्हाल यासाठी मी प्रार्थना करतो”, असे शोएब अख्तरने ट्विटमध्ये म्हटले आहे. शोएबशिवाय, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, सुरेश रैना यांच्यासह अनेक खेळाडूंनी अमिताभ बच्चन यांच्यासाठी प्रार्थना केली.