महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारताने विश्वकरंडक जिंकावा; पाकच्या माजी खेळाडूची इच्छा...का जिंकावं तर सांगितलं 'हे' कारण.. - icc world cup

भारतीय संघाने विश्वकरंडक जिंकावा अशी इच्छा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने बोलून दाखवली. विश्वकरंडकाची ट्रॉफी अशिया खंडात यावी, या उद्देशाने अख्तरने भारतीय संघाला पाठिंबा दिला आहे. त्याने आपल्या यूट्युब चॅनलवर ही इच्छा व्यक्त केली.

भारताने विश्वकरंडक जिंकावा; पाकच्या माजी खेळाडूची इच्छा...का जिंकावं तर सांगितलं 'हे' कारण..

By

Published : Jul 7, 2019, 8:34 PM IST

नवी दिल्ली- भारतीय संघाने विश्वकरंडक जिंकावा अशी इच्छा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने बोलून दाखवली. विश्वकरंडकाची ट्रॉफी अशिया खंडात यावी, या उद्देशाने अख्तरने भारतीय संघाला पाठिंबा दिला आहे. त्याने आपल्या यूट्युब चॅनलवर ही इच्छा व्यक्त केली.

अख्तर म्हणाला की, न्यूझीलंडचा संघ दबावात नाही. ते यावेळी 'चोकर्स' होणार नाहीत. मात्र, माझी इच्छा आहे की करंडकाची ट्रॉफी अशिया खंडात यावी. त्यासाठी मी भारतीय संघाला पाठिंबा देईन, असं त्यानं सांगितलं.

शोएब अख्तरने रोहित शर्माच्या फलंदाजीचे कौतूक केले. रोहित शर्माचा खेळ हा उच्च दर्जाचा असून तो उत्तम टायमिंगने फटके मारतो. त्याचे शॉटची निवडची उत्तम असते. असं तो म्हणाला.

पाकिस्तानच्या संघाने चांगला खेळ केला मात्र, ते उपांत्य फेरीत धडक मारु शकले नाहीत. नेट रननेटमुळे पाकिस्तानचा संघ बाहेर फेकला गेला. मात्र संघाने चांगला खेळ केल्याचे त्याने सांगतलं.

ABOUT THE AUTHOR

...view details