मुंबई- कोरोनाच्या संकटात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारताला मदतीसाठी आर्त साद घातली आहे. त्याने भारताने पाकिस्तानसाठी १० हजार व्हेटिंलेटर बनवून दिल्यास, पाकिस्तान हे उपकार कधीच विसरणार नाही, असे सांगितले. शोएबच्या या विनंतीनंतर नेटिझन्सने त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. एका युजरने, भारत तुम्हाला १० हजार व्हेटिंलेटर देईल, त्या बदल्यात तुम्ही भारताला १० हजार दहशतवादी सोपवणार का? असा सवाल केला आहे.
भारतामध्ये कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. या घडीला देशात कोरोनाचे ५८६५ रुग्ण आहेत. तर १६९ लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमध्येही कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अशा स्थितीत पाकिस्तान दुसऱ्या देशांना मदत मागत आहे. त्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे की, डॉक्टरांकडे उपचार करण्यासाठी किट देखील नाहीत. याच पार्श्वभूमीवर शोएबने त्यांच्या यू-ट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटात, भारताने जर पाकिस्तानला १० हजार व्हेंटिलेटर बनवून दिल्यास, पाकिस्तान हे उपकार कधीच विसरणार नाही, असे सांगितले.