महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

मोदी धोनीला टी-२० वर्ल्डकप खेळण्यास सांगू शकतात - शोएब अख्तर - शोएब अख्तर आणि धोनी न्यूज

एका वाहिनीवर अख्तर म्हणाला, "मला वाटते की धोनी टी-२० विश्वकरंडक स्पर्धा खेळू शकला असता. ज्याप्रमाणे भारत आपल्या दिग्गज व्यक्तींचा सन्मान करतो, त्यांना ओळख मिळवून देतो ते पाहता धोनी टी-२० खेळू शकला असता. मात्र, खेळाडूंना स्वतः ची निवड आहे. धोनीने सर्वकाही जिंकले आहे. रांचीतून आलेल्या या खेळाडूने भारताला उत्सव साजरा करायला शिकवले. जग तुमची आठवण ठेवेल, हेच महत्त्वाचे आहे आणि भारतासारखा देश तुम्हाला कधीच विसरू देणार नाही."

shoaib akhtar said pm narendra modi could ask dhoni to play t20 world cup
मोदी धोनीला टी-२० वर्ल्डकप खेळण्यास सांगू शकतात - शोएब अख्तर

By

Published : Aug 19, 2020, 2:50 PM IST

लाहोर -भारताचा महान माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मागील आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. मात्र, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी धोनीला निवृत्ती मागे घेऊन आगामी टी -२० विश्वकरंडकात खेळण्याची विनंती करू शकतात, असे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने म्हटले आहे. आयसीसीच्या तीनही ट्रॉफी जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे.

एका वाहिनीवर अख्तर म्हणाला, "मला वाटते की धोनी टी-२० विश्वकरंडक स्पर्धा खेळू शकला असता. ज्याप्रमाणे भारत आपल्या दिग्गज व्यक्तींचा सन्मान करतो, त्यांना ओळख मिळवून देतो ते पाहता धोनी टी-२० खेळू शकला असता. मात्र, खेळाडूंना स्वतः ची निवड आहे. धोनीने सर्वकाही जिंकले आहे. रांचीतून आलेल्या या खेळाडूने भारताला उत्सव साजरा करायला शिकवले. जग तुमची आठवण ठेवेल, हेच महत्त्वाचे आहे आणि भारतासारखा देश तुम्हाला कधीच विसरू देणार नाही."

तो पुढे म्हणाला, "तुम्ही पंतप्रधानांना नाही म्हणू शकत नाही. पंतप्रधान त्याला फोन करतील आणि टी-२० विश्वकरंडक स्पर्धा खेळण्याची विनंती करतील. तसेही होऊ शकते. इम्रान खान यांना जनरल झिया-उल-हक यांनी १९८७ नंतर क्रिकेट न सोडण्यास सांगितले होते आणि ते खेळले. मला वाटते की भारताच्या पंतप्रधानांनी धोनीला २०२१च्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेमध्ये भारताचे नेतृत्व करण्याची विनंती केली पाहिजे. धोनीला फेअरवेल सामना देण्यास भारत तयार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. जर त्याला स्वत: हवा नसेल तर वेगळी गोष्ट आहे, पण भारत तयार असेल.""

३९ वर्षीय धोनीने २००४मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून ३५० एकदिवसीय सामने, ९० कसोटी आणि ९८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. धोनीच्या नेतृत्वात २००७मध्ये भारताने पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकला. त्यानंतर २०११मध्ये -एकदिवसीय वर्ल्डकप आणि २०१३मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीही खिशात घातली. धोनीच्या नेतृत्वात भारताने २०१० आणि २०१६चा आशिया चषकही पटकावला.

ABOUT THE AUTHOR

...view details