लाहोर -1999 च्या कारगिल युद्धात भाग घेण्यासाठी काऊंटी क्रिकेट क्लब नॉटिंघमशायरचा 1,75,000 पौंडचा करार धुडकावल्याचा दावा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने केला आहे. कारगिल युद्ध 16,000 फूट उंचावर लढले गेले, ज्यामध्ये 1042 पाकिस्तानी सैनिक ठार झाले तर, 527 भारतीय सैनिक शहीद झाले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अख्तर म्हणाला, "ही कहाणी फार क्वचित लोकांना माहित आहे. मला नॉटिंघमशायरकडून 1,75,000 पौंड कराराची ऑफर होती. त्यानंतर 2002 साठी माझ्याकडे आणखी एक मोठा करार होता. जेव्हा कारगिल झाले तेव्हा दोन्ही ऑफर मी नाकारल्या."