लाहोर - पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने वेगवान गोलंदाज वहाब रियाजच्या कसोटी क्रिकेटमध्ये परतण्याच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. आगामी इंग्लंड दौर्यासाठी वहाबने स्वत: ला उपलब्ध करून दिले. पाकिस्तानला इंग्लंड दौर्यावर तीन सामन्यांची कसोटी मालिका आणि तेवढ्याच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वहाबने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला होता. मात्र, आगामी इंग्लंड दौर्यासाठी पाकिस्तानच्या 29 सदस्यीय संघात त्यांची निवड झाली आहे.