लाहोर - पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथला बाद करण्यांसबंधी प्रतिक्रिया दिली आहे. अख्तर म्हणाला, ''आजही मी स्टीव्ह स्मिथला तीन धोकादायक बाउन्सरनंतर चौथ्या चेंडूवर बाद करू शकतो."
माझ्या चौथ्या चेंडूवर स्मिथ बाद होऊ शकतो - अख्तर - shoaib akhtar latest news
एका क्रीडाविषयक वृत्तसंस्थेने आजी-माजी क्रिकेटपटूंबद्दल एक ट्विट केले होते. कोणत्या फलंदाजासोबत गोलंदाजाचा सामना पाहायला आवडेल, असा प्रश्न या ट्विटमध्ये विचारला गेला होता. त्यामध्ये स्मिथ-अख्तर हा एक पर्याय होता.
एका क्रीडाविषयक वृत्तसंस्थेने आजी-माजी क्रिकेटपटूंबद्दल एक ट्विट केले होते. कोणत्या फलंदाजासोबत गोलंदाजाचा सामना पाहायला आवडेल, असा प्रश्न या ट्विटमध्ये विचारला गेला होता. त्यामध्ये स्मिथ-अख्तर हा एक पर्याय होता. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने नुकतेच स्मिथचे कौतुक केले होते. स्मिथ हा सर्वोत्कृष्ट खेळाडू असल्याचे ब्रॉड म्हणाला होता.
तत्पूर्वी, अख्तरने कोरोनाविरूद्धच्या युद्धात निधी गोळा करण्यासाठी भारत आणि पाकिस्तान मालिकेचा प्रस्ताव दिला होता. मात्र, या प्रस्तावावर अनेक दिग्गज क्रिकेट खेळाडूंनी नकार दिला. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने मात्र अख्तरचे समर्थन केले होते.