महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

VIDEO : "एकमेकांचे कांदे-बटाटे खाऊ शकतो, तर क्रिकेट का खेळू शकत नाही?" - शोएब अख्तर व्हिडिओ न्यूज

शोएबने भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंधावर बोलताना व्यापार, डेव्हिस चषक, कबड्डी सामने, व्यवसाय या गोष्टींवर भर दिला. 'भारताचा कबड्डी संघ पाकिस्तानमध्ये आहे. त्याला इथे खूप आदर मिळतो. आपण डेव्हिस चषक खेळतो. एकतर हे सर्व थांबवा किंवा हे सर्व बंद करा', असे शोएब म्हणाला.

shoaib akhtar new video on india pakistan cricket bilateral series
VIDEO : "एकमेकांचे कांदे-बटाटे खाऊ शकतो, तर क्रिकेट का खेळू शकत नाही?"

By

Published : Feb 18, 2020, 2:10 PM IST

कराची - पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंध पुन्हा सुरू करण्यावर भर दिला आहे. 'दोन्ही देश एकमेकांचे कांदे-बटाटे खाऊ शकतात, तर क्रिकेट का खेळू शकत नाही?', असा सवाल अख्तरने आपल्या नव्या व्हिडिओद्वारे उपस्थित केला आहे.

हेही वाचा -T20 Ranking : विराटची घसरण, मॉर्गन आणि डी कॉकची मोठी झेप

शोएबने भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंधावर बोलताना व्यापार, डेव्हिस चषक, कबड्डी सामने, व्यवसाय या गोष्टींवर भर दिला. 'भारताचा कबड्डी संघ पाकिस्तानमध्ये आहे. त्याला इथे खूप आदर मिळतो. आपण डेव्हिस चषक खेळतो. एकतर हे सर्व थांबवा किंवा हे सर्व बंद करा. आयसीसीच्या स्पर्धा किंवा आशिया चषक देखील तटस्थ ठिकाणी आहेत. द्विपक्षीय मालिकेतही असंच होऊ शकतं', असे शोएब म्हणाला.

'आम्ही किती चांगले अतिथी आहोत हे वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली किंवा सचिन तेंडुलकर यांना विचारा. फरक असो, परंतु यामुळे क्रिकेटचे नुकसान होऊ नये. भारत-पाकिस्तान लवकरच द्विपक्षीय मालिका खेळेल अशी माझी अपेक्षा आहे. यासाठी तटस्थ ठिकाण निवडले जाऊ शकते. पाकिस्तान आता प्रत्येक बाबतीत सुरक्षित देश आहे. कोणीही येथे येऊ शकतो. बांगलादेश आणि श्रीलंका संघ येथे मालिकेत खेळले. एमसीसीची टीम येथे आहे आणि पीएसएल देखील घडत आहे. जर सर्व काही थांबवायचे असेल तर सर्व गोष्टी थांबवल्या पाहिजेत. जेव्हा क्रिकेटचा प्रश्न येतो तेव्हा राजकारण होऊ लागते. हे चुकीचे आहे', असेही शोएबने म्हटले आहे.

दोन्ही देशांमधील शेवटची क्रिकेट मालिका २०१२-१३ मध्ये खेळली गेली होती. त्यानंतर पाकिस्तान संघ तीन एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारतात आला होता. दोन्ही संघांमध्ये शेवटचा कसोटी सामना १३ वर्षांपूर्वी २००७ मध्ये खेळवला गेला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details