लंडन - पूर्ण क्रिकेटविश्व ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी म्हणजेच उद्या खेळण्यात येणार आहे. मात्र इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरू असलेल्या विश्वकंरडक स्पर्धेत सतत पावसाचा व्यत्यय येत आहे. पावसामुळे आतापर्यंत ४ सामने रद्द करण्यात आले आहेत. उद्या होणाऱ्या भारत-पाक सामन्यावरही पावसाचे सावट निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आयसीसीवर अनेंकानी वेगवेगळ्या प्रकारे मिम्स बनवून आयसीसीवर संताप व्यक्त केले आहे. यात आता शोएब अख्तरनेही भर टाकली आहे.
Cricket World Cup : शोएब अख्तरच्या मते असे असेल भारत-पाक सामन्याचे चित्र - World Cup 2019
पाकिस्तान आणि भारत उद्या १६ जूनला मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफॉर्ड क्रिकेट मैदानावर आमने-सामने येणार आहेत.
शोएब अख्तरने आपल्या अधिकृत ट्विटरवरून एक फोटो शेअर करत रविवारी होणाऱ्या भारत-पाक सामन्याचे चित्र कसे असेल हे सांगितले आहे. अख्तरच्या या फोटोत भारतीय कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तान कर्णधार सर्फराज अहमद हे नाणेफेकीनंतर पोहत पॅव्हेलियनकडे येताना दिसत आहेत. तर मैदानावरील क्रिकेट समिक्षक नावेत बसून सामन्यावर चर्चा करताना दिसत आहेत. अख्तरचे हे ट्विट युवराज सिंगने रिट्विट केले आहे.
क्रिकेट विश्वातील कट्टर प्रतिस्पर्धी अशी ओळख असलेले पाकिस्तान आणि भारत उद्या म्हणजेच १६ जूनला मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफॉर्ड क्रिकेट मैदानावर आमने-सामने येणार आहेत.